कुडाळ : प्रतिनिधी
वेताळ बांबर्डे गावातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये शिवसैनिकांकडून शालेय विद्यार्थ्यांसमवेत आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना समोसा, बुंदी लाडू,चकली,पौष्टिक दूध अशा खाद्य पदार्थांचे किट वितरित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फूर्तपणे वाढदिवस शुभेच्छापर समूह गीते सादर करून आमदार निलेश राणे यांना उदंड आयुष्य व उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कट्टर शिवसैनिक प्रसाद गावडे अवधूत सामंत, आरिफ मुजावर, भूषण बांबार्डेकर, निलेश बांबर्डेकर, आरिफ मुजावर, सारिका कदम,रितिका गावडे रोहिणी चव्हाण, शिवाजी कदम दिनेश कदम,संतोष कदम, अरुण गावडे, नाना कदम, संदीप सावंत, विजय सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते.









