ठळक घडामोडी

कुडाळ बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिर नेरुर येथे!

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ एमआयडीसी येथील बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागामार्फत सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन नेरुर येथील यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र येथे सोमवार, दिनांक १५ ते रविवार दिनांक २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत करण्यात आले आहे.
    या शिबिराचे उद्घाटन सोमवार, दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नेरुर गावच्या सरपंच सौ. भक्ती घाडीगावकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमास बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भंडारी, नेरुर गावचे उपसरपंच दत्ताराम म्हाडदळकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संतोष चव्हाण आदी मान्यवर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. शिबिर कालावधीत प्रा. अरुण मर्गज, तृप्ती प्रभू – देसाई, प्रा. सिद्धी पाताडे, डॉ. गार्गी ओरोसकर, प्रमोद काळसेकर, सौ. कल्पना भंडारी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
    “भारताच्या शाश्वत विकासासाठी तरुणांचे सक्षमीकरण” ही या शिबिराची मुख्य संकल्पना असून, या सात दिवसीय कालावधीत ग्रामस्वच्छता, धार्मिक स्थळांची स्वच्छता, विविध बौद्धिक चर्चासत्रे, तसेच मनोरंजनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तरी गावातील ग्रामस्थ, हितचिंतक व नागरिकांनी या शिबिरास उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे संयोजक प्रा. वैशाली ओटवणेकर, प्रा. वैजयंती नर व प्रा. मानसी धुरी यांनी केले आहे.

error: Content is protected !!