ठळक घडामोडी

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. विशाल रेड्डी यांची बदली!

कणकवली : प्रतिनिधी
      येथील उपजिल्हा रुग्णालयात एमडी फिजिशियन म्हणून सेवा देणारे डॉ. विशाल रेड्डी यांची सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात बदली करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी काढलेल्या आदेशानुसार ही बदली झाली आहे. डॉ. रेड्डींच्या  बदलीमुळे नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ. रेड्डी यांनी मागील काही वर्षांत कणकवली उपजिल्हा रुग्णालयात चांगली सेवा दिली होती. रुग्णांच्या समस्या समजून घेत त्यावर तत्परतेने उपचार करण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेत असत. आपत्कालीन परिस्थितीतही ते तातडीने रुग्णालयात दाखल होत रुग्णांना सेवा देत असल्याने अनेकांचा त्यांच्यावर विश्वास होता. त्यांच्या बदलीचे वृत्त समताच नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, पालकमंत्री  नितेश राणे यांनी बदली या प्रकरणाची गांभीयार्ने दखल घेऊन डॉ. विशाल रेड्डी यांची पुन्हा कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नियुक्ती करावी. तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी स्वतंत्र फिजिशियनची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

error: Content is protected !!