

मालवण : प्रतिनिधी
मालवण धुरीवाडा येथील सुप्रसिद्ध अष्ठपैलू क्रिकेटपट्टू संदीप सुभाष कातणनकर (वय 45) यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.त्याच्या अकाली निधनामुळे क्रिकेट प्रेमीमंध्ये हळहळ व्यक्त कारण्यात आली.
रविवारी दुपारी त्याची आई पत्नी जेवण आटोपून झोपी गेली असताना संदीप याने घराच्या ओट्यावर गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत येथील नागरिकांनी मालवण पोलिसांना दिली असता पोलीस उपनिरीक्षक गणेश माने पोलीस कॉन्स्टेबल जनार्दन रेवंडकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
संदीप कातवणकर याने मालवण स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले.त्याला क्रिकेटची प्रचंड आवड होती आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत संदीप याने उत्कृष्ट फलंदाजी करत आपले क्रीडा कौशल्य दाखवून महाविद्यालयाचे नाव लौकिक केले होते. त्यानंतर जिल्ह्यातील नामवंत मालवणचा संघ प्ले बॉईज संघातुन संदीप यांने प्रतिनिधित्व केले होते त्याच्या या अकाली निधनामुळे क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या पश्चात आई पत्नी मुलगा बहीण असा परिवार आहे.









