ठळक घडामोडी

देवगड येथील लोक अदालतीत ५७ प्रकरणे निकाली

देवगड : प्रतिनिधी

     उच्च न्यायालय- मुंबई, राज्य विधी सेवा प्राधिकरण- मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग-ओरोस यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून येथील दिवाणी न्यायालय ‘क’ स्तर येथे शनिवार, दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन दिवाणी न्यायाधीश तथा देवगड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष श्रीकांत पचंडी यांच्या हस्ते झाले. या लोकअदालतीत दिवाणी व फौजदारी खटले तसेच वादपूर्व प्रकरणे अशा १००७ पैकी एकूण ५७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून २८ लाख ६४ हजार ४१७ रूपये वसुली झाली.

देवगड तालुका विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरकारी वकिल, सर्व ज्येष्ठ व कनिष्ठ विधीज्ञ व दिवाणी न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार, बँकांचे अधिकारी, वीज वितरण कंपनीचे अधिकारी आदी उपस्थित होते. या लोकअदालतीत दिवाणी व फौजदारीकडील एकूण २८८ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील ५६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून २८ लाख ३२ हजार १२१ रूपये वसुली झाली. बँक, महावितरण यातील ७१९ वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील एक प्रकरण निकाली काढण्यात आले. यातून ३२ हजार २९६ रूपये वसुली झाली. पॅनेल सदस्य म्हणून अॅड. रूपेश राणे यांनी काम पाहिले.

error: Content is protected !!