ठळक घडामोडी

सेलिब्रिटींची रविवारी कुडाळ तालुक्याला खास भेट

अणाव आणि आंदुर्ले गावात ‘सेलिब्रिटी गावभेट’ कार्यक्रम

अभिनेता पृथ्वीक प्रताप आणि अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर उपस्थित राहणार

कुडाळ : प्रतिनिधी
      मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कुडाळ तालुक्यातील अणाव आणि आंदुर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने ‘सेलिब्रिटी गावभेट’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते पृथ्वीक प्रताप व अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
     या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब तसेच गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अणाव येथील श्री देव स्वयंभू रामेश्वर मंदिर येथे सकाळी ८.३० वाजता आणि आंदुर्ले येथील श्री देवी चामुंडेश्वरी मंदिर येथे दुपारी १२ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अणाव सरपंच लीलाधर अणावकर व आंदुर्ले सरपंच अक्षय तेंडोलकर व ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!