ठळक घडामोडी

बिबवणे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

५८ वेळा रक्तदान करणाऱ्या प्रसाद निर्गुण यांचा गौरव

बिबवणे ग्रामपंचायत व स्वराज मित्रमंडळाचा उपक्रम

कुडाळ : प्रतिनिधी
    समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत बिबवणे ग्रामपंचायत, स्वराज मित्र मंडळ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने बिबवणे येथील जि. प. प्राथमिक शाळा क्र. १ येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
      कार्यक्रमाला बिबवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा माजी मुख्याध्यापक प्रकाश कुबल, सरपंच सृष्टी कुडपकर, ग्रामपंचायत सदस्या आर्या मार्गी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुधीर लुडबे, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, विभाग संघटक यशवंत गावडे, शिक्षक एकनाथ कुर्लेकर, सीएचओ शलाका चव्हाण, रक्तपेढी तंत्रज्ञ मनीष यादव उपस्थित होते.
    या वेळी दुर्मिळ ओ-निगेटिव्ह रक्तगटाचे ५८ वेळा रक्तदान करणारे प्रसाद निर्गुण यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिबिरासाठी लाईफटाइम हॉस्पिटल रक्तपेढीचे डॉ. गणेश जायभाये, मनिष यादव, चेतन सावंत, अमृता आचरेकर, वनिता जंगले, गौरवी चव्हाण यांचे सहकार्य लाभले. यावेळी माजी सरपंच यशवंत (दादा) चव्हाण, पोलीस पाटील शैलेश राऊळ, सोमनाथ वेंगुर्लेकर, दादा नाईक, पप्पू वेंगुर्लेकर, प्रसाद नाईक, सूरज कुडपकर, लिपीक गिरीश राऊळ, राजन नागवेकर, अभिषेक वेंगुर्लेकर, समीर राऊळ, रुपेश वालावलकर, धोंडी गावडे, महेश वारंग, नीलेश मार्गी, शार्दूल शिरोडकर, दत्ताराम उर्फ नीलेश वेंगुर्लेकर, सतीश देऊलकर, आनंद बिबवणेकर, महेश बिबवणेकर, पिट्या कुडपकर, रोहन नाईक, सिद्धेश सामंत, गणपत जेठे, ओंकार रमाकांत सावंत, अभिषेक गावडे, आशा सेविका रुची लाड व ग्रामपंचायत कर्मचारी संदेश नाईक उपस्थित होते.

error: Content is protected !!