मुख्याध्यापकांच्या बदलीविरोधात पालक–ग्रामस्थ एकवटले
बदली रद्द करण्याची मागणी, प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा आंबडपाल येथील मुख्याध्यापक संजय बगळे यांची बदली रद्द करून त्यांना तात्काळ याच शाळेत हजर करून घ्यावे, या मागणीसाठी सोमवारी सकाळपासून पालक व ग्रामस्थांनी एकवटत शाळा बंद आंदोलन सुरू केले आहे.
श्री.बगळे यांनी अलिकडेच अन्यत्र बदली करण्यात आली आहे. ती बदली रद्द करून त्यांना याच शाळेत कार्यरत ठेवण्यात यावे अशी मागणी शाळा समितीसह पालकांनी शाळा बंद आंदोलन छेडत प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी सरपंच महेश मेस्त्री, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश तानीवडे, भगवान सावंत, सचिन सावंत, पालक तानाजी सावंत, संतोष सावंत, मानसी सावंत, दिनकर सावंत, सान्वी सावंत, रामा सावंत, आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. आता प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.









