ठळक घडामोडी

कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला!

मुंबईत घेतली सदिच्छा भेट

कणकवली : प्रतिनिधी
     शहर विकास आघाडीचे कणकवली नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आज (मंगळवारी) मुंबई येथे शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना नगराध्यक्षपदी विजयी झाल्याबद्दल शुभेच्छा देत अभिनंदन केले. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे, माजी आमदार राजन तेली आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!