

मुंबई : प्रतिनिधी
बेलापूर येथे आयोजित कोकण विभागीय स्तरावरील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन्मान सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींचा दिमाखदार गौरव करण्यात आला.
सन २०१८–१९ ते २०२२–२३ या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हुमरस(ता. कुडाळ), आयनोडे हेवाळे(ता. दोडामार्ग), बापर्ड(ता. देवगड), परुळे बाजार( ता. वेगुर्ला) आणि निरवडे(ता. सावंतवाडी) या ग्रामपंचायतींना सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यास विभागीय आयुक्तांसह विविध मान्यवर उपस्थित होते. विभागीय स्तरावर मिळालेल्या या गौरवामुळे जिल्ह्यातील स्वच्छता उपक्रमांना नवे बळ मिळाले आहे.









