ठळक घडामोडी

कुडाळमध्ये अपघात; कुटुंब बचावले!

तहसीलदार कार्यालय नजिकच्या रस्त्यावर अपघात

अनियंत्रित बोलेरो जीप थेट दुभाजकावर धडकली

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ काॅलेज चौक ते अभिमन्यू हाॅटेल दरम्यान तहसीलदार कार्यालया नजिकच्या रस्त्यावर जीपला अपघात झाला. पिंगुळीहून सावंतवाडीच्या दिशेने जाणा-या बोलेरी जीपच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि जीप दुभाजकावर चढली. त्यानंतर पुढील चाके दुस-या लेनवर उतरली. हा अपघात आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास झाला. यात सुदैवाने दोन लहान मुलांसह चार जण बालंबाल बचावले. यात दुभाजकाचे नुकसान झाले. घटनास्थळी नागरीकांची मोठी गर्दी झाली.

error: Content is protected !!