ठळक घडामोडी

कुडाळ बसस्थानक रिक्षा स्टँडवर इ-रिक्षाला कडाडून विरोध!

विनापरमिट इ-रिक्षा उभी केल्याने रिक्षा व्यावसायिक आक्रमक

इ-रिक्षा वादावर आरटीओंची धाव; पण स्थानिक रिक्षा व्यावसायिक भूमिकेवर ठाम

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ बसस्थानकासमोरील रिक्षा स्टँडमध्ये नवीन इ-रिक्षा लावण्यास सोमवारी स्थानिक रिक्षा व्यावसायिकांनी कडाडून विरोध केला. या वादाची माहिती मिळताच उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांनी सायंकाळी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी रिक्षा व्यावसायिकांनी विना परमिट इ-रिक्षा या रिक्षा स्टँडवर उभी करण्यास तीव्र विरोध दर्शवला. आरटीओ अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंची मते ऐकून मध्यस्थी करत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक रिक्षा व्यावसायिक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

error: Content is protected !!