शिंदे शिवसेनेकडूनही तात्काळ मदत सुपूर्द
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ शहरातील माठेवाडा परिसरात सोमवारी पहाटेच्या सुमारास रुग्णालयाच्या जागेत असलेल्या वडाच्या झाडाचा मोठी फांदी कोसळून झाडाखाली असलेल्या चहाच्या स्टॉलचे मोठे नुकसान झाले. या घटनेत स्टॉलधारकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. सदर स्टॉल कविलकाटे येथील चंद्रकांत पेडणेकर कुटुंबीयांचा असून, याच स्टॉलवर त्यांची उपजीविका चालते. नुकसान झाल्याची माहिती मिळताच नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी घटनास्थळी भेट देत पेडणेकर कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत दिली.
यावेळी नगरसेवक विलास कुडाळकर, अॅड. राजीव कुडाळकर, नयना मांजरेकर, शिवम म्हाडेश्वर, प्रथमेश कांबळी, चंद्रकांत पेडणेकर, सौ.चंद्रकला पेडणेकर उपस्थित होते. तसेच कुडाळ शहर शिंदे शिवसेनेच्या वतीने स्टॉलधारक पेडणेकर कुटुंबीयांना २० हजार रुपयांची रोख मदत करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख ओंकार तेली, शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे, गटनेते नगरसेवक विलास कुडाळकर, ऍड. राजीव कुडाळकर, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम, शहर संघटक राकेश कांदे, उपशहरप्रमुख चेतन पडते, प्रथमेश केळबाईकर, विलास वराडकर, दादा जळवी, चंदन कांबळी, राजवीर पाटील, प्रथमेश कांबळी, संदेश सावंत, बाबू हरमलकर, दादा गडेकर, आनंद अनावकर, आणा जळवी, समीर जळवी, निलेश जळवी, प्रसाद आळवे, सुजित पावसकर, दर्शन आळवे आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










