बांदा : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नवनिवार्चित अध्यक्ष प्रमोद कामत यांची कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे सुपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते राज नलावडे याने कामत यांची अर्णव स्वार यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट घेतली.
या भेटीत राज याने कामत यांच्या राजकीय प्रवासाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच लोकप्रतिनिधी म्हणून सामाजिक व राजकीय क्षेत्रात नेमकी भूमिका काय असते, याबाबतही दोघांमध्ये चर्चा झाली. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून प्रमोद कामत ओळखले जातात. त्यांनी आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जि.प. सदस्य म्हणून पहिल्यांदा निवडून आल्यानंतर त्यांच्यावर आरोग्य व शिक्षण समितीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत बांदा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर प्रमोद कामत हे बिनविरोध निवडून आले असून, त्यांना जिल्ह्याचे सर्वोच्च पद भूषविण्याची संधी मिळाली आहे. याबद्दल राज नलावडे यांनी त्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्याच्यासोबत बांदा येथील युवा उद्योजक अर्णव स्वार उपस्थित होते.









