ठळक घडामोडी

म्हापण माळरानावर अचानक आगीचे तांडव!

काजू-आंबा कलमे जळाली; मोठे नुकसान

आग नियंत्रणासाठी ग्रामस्थांचे शर्थीचे प्रयत्न

कुडाळ : प्रतिनिधी
     म्हापण (ता. वेंगुर्ले) येथील माळरानावर आज गुरुवारी दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. करड्याने पेट घेतल्याने आग परिसरात सर्वत्र पसरली. त्यामुळे काही भागातील काजू व आंब्याची कलमे जळून खाक झाली. यात मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, परिसरातील सुके गवत आणि वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आग अधिक भडकल्याने ती विजवताना ग्रामस्थांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

error: Content is protected !!