ठळक घडामोडी

पावशी मतदारसंघात महायुतीचा जोरदार प्रचार दौरा!

शिंदे शिवसेनेच्या महिला रणरागिणी प्रचारात आघाडीवर

मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – दादा साईल व निखिल कांदळगावकर

कुडाळ : प्रतिनिधी
     शिवसेना (शिंदे गट) –भाजपा महायुतीच्या वतीने जि.प.गट क्रमांक २८ पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात जोरदार निवडणूक प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रचार दौऱ्यात पावशी जिल्हा परिषद उमेदवार तुकाराम उर्फ दादा साईल आणि डिगस पंचायत समिती उमेदवार निखिल कांदळगावकर यांच्या प्रचारासाठी शिंदे शिवसेनेच्या महिला रणरागिणी मोठ्या संख्येने मैदानात उतरल्या होत्या.
     प्रचारादरम्यान घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधत महायुतीच्या विकासात्मक धोरणांची माहिती देण्यात आली. याच दौऱ्याचा भाग म्हणून डिगस येथील सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेलाही उमेदवारांनी भेट देत खेळाडू तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला. या वेळी प्रचारात असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मतदारसंघातील नागरिकांकडून प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विकासाच्या मुद्द्यांवर मतदारांचा विश्वास मिळत असल्याचे दादा साईल आणि निखिल कांदळगावकर यांनी सांगितले. आगामी काळात प्रचार आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!