ठळक घडामोडी

दोडामार्ग कार-दुचाकीत अपघात; दोघे जखमी

दोडामार्ग : प्रतिनिधी
     दोडामार्ग येथे दुचाकी व कारची समोरासमोर धडक बसून अपघात झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकी वरील दोन्ही व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
     पेडणे येथील एक युवक गुरुवारी त्याची कार घेऊन पिकुळे येथे सासरवाडीला आला होता. सायंकाळच्या सुमारास तो घरी जाण्यासाठी निघाला. दरम्यान दोडामार्ग शहराजवळ पोहोचला असता समोरून येणाऱ्या दुचाकीची त्याच्या कारला धडक बसली. दुचाकीस्वाराचे डोके कारच्या दर्शनी काचेवर आदळले. यात त्याच्या डोक्याला व उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. दुचाकीस्वाराच्या मागे बसलेली व्यक्तीही या अपघातात जखमी झाली. दोघांनाही तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळतात पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. अपघाताची भीषणता इतकी तीव्र होती की दुचाकीचे समोरील चाक कारच्या दर्शनी भागात पूर्णतः घुसून अडकून बसले. शिवाय हॅण्डलही पुर्णतः वाकडे झाले. या अपघातात दुचाकी व कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

error: Content is protected !!