ठळक घडामोडी

कुडाळ तालुका : ११.३० वाजेपर्यंत २४.३५ टक्के मतदान!

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६

कुडाळ : प्रतिनिधी
       कुडाळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी सकाळपासून शांततेत मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी ११.३० वाजेपर्यंत तालुक्यात एकूण २४.३५ टक्के मतदान झाले असून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. आतापर्यंत झालेल्या मतदानामध्ये स्त्री मतदार १२,१४७, तर पुरुष मतदार १६,२५३ इतके मतदान झाले आहे. यामध्ये एकूण २८,४०० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्व मतदान केंद्रांवर पोलीस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत आहे.

error: Content is protected !!