ठळक घडामोडी

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात देवगड हायस्कूलचे यश

देवगड : प्रतिनिधी

     तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शेठ म. ग. हायस्कूल, देवगडच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी कामगिरी करत गुणवत्तापूर्ण यश संपादन केले. हे विज्ञान प्रदर्शन दिनांक ९ व १० डिसेंबर २०२५ रोजी एन. एस. पंत वालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड येथे आयोजित करण्यात आले होते.

या प्रदर्शनातील विविध स्पर्धांमध्ये प्राथमिक व माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली.

प्राथमिक गट वक्तृत्व स्पर्धा : कुमारी श्रीमा मुकुल प्रभूदेसाई (इ. ७ वी) — तृतीय क्रमांक,
निबंध स्पर्धा : कुमार सुयश सुदेश गोलतकर (इ. ६ वी) प्रथम क्रमांक
माध्यमिक गट विज्ञान प्रतिकृती स्पर्धा : कुमार अथर्व भरत पराडकर व कुमार जयेश पांडुरंग डगरे (इ. ९ वी) प्रथम क्रमांक
वक्तृत्व स्पर्धा : कुमारी स्नेहा महादेव नागरगोजे (इ. ९ वी) प्रथम क्रमांक,
निबंध स्पर्धा : कुमारी दीक्षा विवेक मिस्त्री (इ. १० वी) — प्रथम क्रमांक
प्रश्नमंजुषा स्पर्धा : कुमारी प्राजक्ता केदार भिडे व कुमारी राज्ञी विवेक कुळकर्णी (इ. १० वी) — द्वितीय क्रमांक

विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या विज्ञान विषय शिक्षकांचे मुख्याध्यापक श्री. प्रवीण खडपकर, संस्था पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून कौतुक केले आहे.

error: Content is protected !!