ठळक घडामोडी

सिंधुदुर्ग भाजपाकडून मोठी शिस्तभंग कारवाई; २३ पदाधिकारी–कार्यकर्ते सहा वर्षांसाठी निलंबित!

अधिकृत उमेदवाराविरुद्ध उमेदवारी व विरोधी उमेदवाराला मदतीचा ठपका

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती; निवडणूक पार्श्वभूमीवर कडक निर्णय

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
     जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर झालेल्या पार्श्वभूमीवर पक्षशिस्त मोडणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर सिंधुदुर्ग भारतीय जनता पार्टीने कठोर कारवाई केली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध उमेदवारी अर्ज कायम ठेवणे तसेच विरोधी उमेदवाराला मदत करणे, अशा प्रकारच्या पक्षविरोधी कृती केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सहा वर्षांसाठी तात्काळ निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.
      जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाचे अधिकृत उमेदवार रिंगणात असताना काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून पक्षशिस्तीचे उल्लंघन केले. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष या नात्याने सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे प्रभाकर सावंत यांनी स्पष्ट केले. निलंबित करण्यात आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये पुढील व्यक्तींचा समावेश आहे : श्री. राजन बाळकृष्ण चिके (फोंडा, ता. कणकवली), श्री. राजेंद्र दत्ताराम म्हापसेकर (कोनाळकट्टा, ता. दोडामार्ग), श्रीम. सुजाता अजित पडवळ (तुळस, ता. वेंगुर्ला), श्रीम. वंदना किरण किनळेकर (म्हापण, ता. वेंगुर्ला), श्री. विजय महादेव रेडकर (मातोंड, ता. वेंगुर्ला), श्री. जनार्दन रुक्मानंद कुडाळकर (आडेली, ता. वेंगुर्ला), श्री. डायगो (मायकल) फ्रान्सिसी डिसोजा (कोलगाव, ता. सावंतवाडी), श्री. जितेंद्र पांडुरंग गावकर (माजगाव, ता. सावंतवाडी), श्री. योगेश अशोक केणी, श्री. स्वागत रघुवीर नाटेकर, श्री. नितीन एकनाथ राऊळ (सर्व इन्सुली, ता. सावंतवाडी), श्रीम. शर्वाणी शेखर गावकर, श्रीम. स्नेहल संदीप नेमळेकर (आरोंदा, ता. सावंतवाडी), श्री. उल्हास उत्तम परब (सातार्डा, ता. सावंतवाडी), श्रीम. साक्षी संदीप नाईक, श्रीम. सुप्रिया शैलेश नाईक, श्रीम. सुनीता कमलाकर भिसे, श्री. प्रवीण नारायण गवस, श्री. अनिरुद्ध फाटक (सर्व ता. दोडामार्ग), श्रीम. सोष्मिता अरविंद बांबर्डेकर, श्री. योगेश राजाराम तावडे (ओरोस, ता. कुडाळ), श्री. रुपेश अशोक पावसकर (नेरूर, ता. कुडाळ) आणि श्री. विजय वासुदेव नाईक (आडेली, ता. वेंगुर्ला) यांचा समावेश आहे.

error: Content is protected !!