लग्न मंडपात जाण्यापूर्वी मतदान; परूळेतील नववधूचा प्रेरणादायी निर्णय
कुडाळ : प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान आज शनिवारी सकाळी परुळे मधील नववधू माधवी दाभोलकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावून नागरिक कर्तव्याचा आदर्श ठेवला.
परुळे येथील मतदान केंद्र क्रमांक 34/13 येथे माधवी दाभोलकर यांनी मतदान केले. मतदानाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या थेट लग्न मंडपात रवाना झाल्या. लग्नासारख्या महत्त्वाच्या क्षणातही मतदानाला प्राधान्य देत त्यांनी लोकशाहीप्रती आपली बांधिलकी दाखवून दिली. त्यांच्या या आदर्शवत निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.









