ठळक घडामोडी

नेरूर सरपंच-उपसरपंचांसह ठाकरे शिवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश

नेरूरला आमदार निलेश राणे यांची काॅर्नर प्रचार सभा

कुडाळ : प्रतिनिधी
         कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायतीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सरपंच सौ.भक्ती घाडी, उपसरपंच दत्ता म्हाडदळकर यांच्यासह ठाकरे शिवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी प्रवेशकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. जि.प.व पं.स. निवडणुक दरम्यान हा पक्ष प्रवेश ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.
         जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी सायंकाळी आमदार निलेश राणे यांची नेरूर दुर्गवाड येथे काॅर्नर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, विधानसभा मतदारसंघ प्रचार प्रमुख काका कुडाळकर, जि.प. उमेदवार संजय पडते, पं.स.उमेदवार निता नाईक व ममता देसाई, जिल्हा बँक संचालक नीता राणे, अरविंद करलकर, उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक, वालावल सरपंच राजा प्रभू, महिला आघाडी तालुका प्रमुख रचना नेरूरकर, संदेश नाईक, रश्मी नाईक यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     यावेळी सरपंच भक्ती घाडी, उपसरपंच दत्ता म्हाडदळकर, माजी उपसरपंच समद मुजावर, लक्ष्मी सडवेलकर, मनोज सडवेलकर यांच्यासह असंख्य ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. सुशील कदम यांची शिवसेना तालुका सरचिटणीस पदी निवड जाहीर करण्यात आली.

error: Content is protected !!