ठळक घडामोडी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यशैली आजही प्रेरणादायी – राजू राऊळ

कुडाळ : प्रतिनिधी
     भाजपाचे माजी आमदार आप्पा गोगटे यांच्या देवगड तालुक्यातील नळपाणी योजनेचा गाळ काढण्याचा प्रश्न प्रलंबित होता. तो प्रश्न मार्गी लागत नसल्याने आप्पा गोगटे थेट तत्कालीन जलसंपदा मंत्री ना. अजित पवार यांच्याकडे गेले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जोपर्यंत माझे काम मार्गी लागत नाही, तोपर्यंत मी तुमच्या केबिनमधील खुर्चीत बसणार नाही.
यानंतर आप्पा गोगटे केबिनसमोरील पायरीवर बसले. हे पाहून ना. अजित पवार यांनीही त्यांच्यासोबत पायरीवर बसत, तुमचे काम होत नाही तोपर्यंत मीही इथेच बसणार, असे सांगितले. त्याच वेळी ना. पवार यांनी तात्काळ सचिवांना बोलावून संबंधित कामाची वर्क ऑर्डर काढण्याचे आदेश दिले. परिणामी देवगड येथील नळपाणी योजना पूर्णत्वास आली.अशा प्रकारे निर्णयक्षम आणि प्रभावी कार्यपद्धती असलेले नेतृत्व ना. अजित पवार यांचे होते. असे कार्यक्षम व धडाडीचे नेतृत्व असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आज आपल्यातून निघून गेले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो, अशी प्रतिक्रिया कुडाळ भाजपाचे राज्य परिषद सदस्य राजू राऊळ यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!