ठळक घडामोडी

कुडाळमध्ये अपघात; दुचाकीस्वार गंभीर!

दुचाकीची बोलेरो पिकअपला जोरदार धडक

कुडाळ : प्रतिनिधी
        कुडाळ शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर नजिकच्या कृष्णाई सुपर मार्केट परिसरात आज मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. काळपनाका हायवेच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीने बोलेरो पिकअपला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो जागीच कोसळला. जखमीला तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची समजते.
      अपघाताचा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. बोलेरो चालकाने अचानक ब्रेक मारल्याने हा अपघात झाला अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. अपघाताची माहिती मिळताच शिंदे शिवसेना तालुका संघटक रोहित भोगटे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ १०८ रुग्णवाहिकेला पाचारण केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दुचाकीस्वाराला स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून तातडीने कुडाळ येथील ग्रामीण  रुग्णालयात हलवण्यात आले. घटनास्थळी नागरीकांची मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहीती मिळताच कुडाळ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

error: Content is protected !!