ठळक घडामोडी

सेवासुविधांमध्ये दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई : नगराध्यक्ष संदेश पारकर

स्वच्छता, पाणीपुरवठा व पथदीप बाबत नगरपंचायतीला कडक निर्देश

कणकवली नगरपंचायतीच्या कामकाजाचा आढावा; कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित

कणकवली : प्रतिनिधी
     कणकवली नगरपंचायतीमार्फत शहरातील नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवासुविधांमध्ये दिरंगाई किंवा हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिला.
      नगराध्यक्ष दालनात गुरूवारी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी स्वच्छता, सांडपाणी निचरा, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन व पथदीप या बाबींवर भर देत प्रत्येक कर्मचाऱ्याची जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश दिले.
     बैठकीत सार्वजनिक स्वच्छतागृहांची नियमित सफाई, ठिकठिकाणी होणा-या मच्छी विक्रीस आळा घालणे, ज्या ठिकाणी पथदीप नाहीत तेथे नवीन पथदीप बसवणे तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना पूर्ण मानधन देण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या. शहराची जीर्ण नळयोजना दुरुस्तीसाठी सुधारित आराखड्याला लवकरच मंजुरी मिळवून आणू, अशी ग्वाही नगराध्यक्ष पारकर यांनी दिली. या बैठकीला नगरसेवक सुशांत नाईक, नगरपंचायतीचे अधीक्षक अमोल अघम, पाणीपुरवठा अधिकारी मनोज धुमाळे, अभियंता सचिन नेरकर, विभव करंदीकर, स्वच्छता कर्मचारी ध्वजा उचले, अमोल भोगले यांच्यासह चेतन अंधारी, चेतन मुंज, सुजित जाधव, विलास कोरगावकर, तेजस राणे, गौरव हर्णे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!