सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ६१.९८ टक्के मतदान झाल्याची अधिकृत आकडेवारी निवडणूक प्रशासनाने जाहीर केली आहे. शनिवार ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान शांततेत पार पडले.
तालुकानिहाय अंतिम मतदान टक्केवारीनुसार वेंगुर्ला (६९.०३%) व सावंतवाडी (६९.५४%) येथे सर्वाधिक मतदान झाले. कुडाळ (६०.०८%), कणकवली (५९.८१%), दोडामार्ग (५९.८३%), मालवण (५८.९०%), देवगड (५७.१२%) तर वैभववाडी (५४.७९%) अशी नोंद झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पडली असून, उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. उद्या सोमवारी ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल स्पष्ट होणार आहेत.







