प्रिन्स स्पोर्ट्स, समादेवी मित्रमंडळ कुडाळ व कलेश्वर मित्रमंडळ नेरूर यांचे आयोजन
कुडाळ क्रीडा संकुलावर रंगली थरारक अंतिम लढत; फ्रेंडशिप चेंदवन संघ उपविजेता
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ येथील क्रीडा संकुलात गेल्या पाच दिवसांपासून रंगलेल्या आंतरराज्यस्तरीय डे-नाईट क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या ‘गोवन स्ट्रायकर्स’ संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. प्रिन्स स्पोर्ट्स, समादेवी मित्रमंडळ कुडाळ व कलेश्वर मित्रमंडळ नेरूर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज सुमित डोंगरे (फ्रेंडशिप) उत्कृष्ट गोलंदाज रोहन साळगावकर(गोवन स्ट्रायकर्स) उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गौरेश नागवेकर(गोवन स्ट्रायकर्स) उत्कृष्ट यष्टिरक्षक गोपाळ बटा( फ्रेंडशिप) तर स्पर्धेमध्ये धावांचा रतीब घालणाऱ्या रजत कुडाळकर ( गोवनस्ट्रायकर ) याला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.
रविवारी शेवटच्या दिवशीचा पहिला उपांत्य सामना फ्रेंडशिप चेंदवन व भाव्यांश साईश इलेव्हन सावंतवाडी या दोन संघा दरम्यान झाला. प्रथम फलंदाजी करताना फ्रेंडशिप संघाने मर्यादित आठ षटकांमध्ये 91 धावांचा डोंगर उभा केला .या संघातील सुमित डोंगरे यांनी 18 चेंडूमध्ये 39 धावा जमवल्या. प्रत्युतरादाखल 92 धावांचा आव्हान साईश स्पोर्ट संघाला पेलवले नाही. फ्रेंडशिप संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. फ्रेंडशिप संघाच्या सुमित डोंगरे याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
दुसरा उपांत्य सामना धाडसकळ गोवा व गोवन स्ट्रायकर्स या दोन संघांमध्ये झाला. प्रथम फलंदाजी करताना गोवन स्ट्रायकर संघाने इमरान (25) साहिल वायंगणकर( 17) यांच्या फलंदाजीच्या जोरावर मर्यादित आठ षटकांमध्ये 85 धावा जमवल्या. 86 धावांचं आव्हान पार करत असताना सुरज गावडे (23 )व अमित नाईक (40) यांनी सामन्यांमध्ये रंगत आणली .मात्र संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही .गोवन स्ट्रायकर संघाच्या इमरान याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पीटर फर्नांडिस (23 )सोहेल शेख (18) बबन नाईक ( 21 )यांच्या फलंदाजीच्या जोरावर फ्रेंडशिप चेंदवन संघाने मर्यादित आठ षटकांमध्ये 70 धावा जमवल्या. गोवन स्ट्रायकर संघाच्या रोहन साळगावकरने टिच्चून गोलंदाजी करताना दोन षटकात पाच धावा देत दोन गडी बाद केले. 71 धावांचं आव्हान गोवन स्ट्रायकर संघाने रजत कुडाळकर( 23 )भूषण गोळे (15) यांच्या फलंदाजीच्या जोरावर सहजपणे पार केले. अंतिम सामन्यातील सामनावीर रोहन साळगावकर याला देण्यात आला.
विजेत्या गोवन स्ट्रायकर संघाला रोख 150000 व चषक व उपविजेत्या फ्रेंडशिप चेंदवन संघाला रोख 75000 बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष संतोष शिरसाट, बबन परब, सुनील धुरी, नितीन नेमळेकर, अनिल कुलकर्णी, प्रदीप माने,बंड्या सावंत, किरण वारंग, अतुल सामंत, दिलीप परब ,जीवन बांदेकर, बाळा बानवलकर, प्रवीण मांजरेकर, सचिन कांबळी, जितेश पटेल ,सिद्धेश सावंत, अरुण खानोलकर, डॉक्टर अमोघ चुबे ,डॉक्टर संजीव आकेरकर, डॉक्टर जी.टी. राणे, डॉक्टर संजय सावंत, डॉक्टर संजय निगुडकर ,श्याम कोळंबकर ,रुपेश कुडाळकर, श्रीकृष्ण सामंत ,दिनेश म्हाडगूत, प्रशांत मागाडे, प्रकाश आघाव,संतोष कविटकर,गोपाळ वेंगुर्लेकर, नागेश सावंत ,संदीप रुद्रे ,गणपत दळवी ,पप्पू म्हाडेश्वर ,सुहास पिळणकर, भाई भिंगारे, मंगेश तेंडुलकर, धैर्यशील परभणीकर ,ऋषिकेश गावडे ,राजाराम परब, सद्गुरु डिचोलकर, रिझवान मणियार, सचिन कुडाळकर, संज्योत गावडे,संजय पाटकर ,राकेश नेमळेकर, अजित खंडे ,रोशन कदम, मकरंद नाईक, आनंद शिरोडकर, नाना कुडाळकर, अनिकेत मोरे ,सलीम शहा, दीपक कुडाळकर ,रोहन कोरगावकर, धनंजय परब ,प्रज्योत सावंत, राकेश म्हाडदळकर ,समद मुजावर, मॅक्सी फर्नांडिस, शेखर गावडे, सुधीर म्हाडदळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
या सामन्यासाठी पंच म्हणून उमेश मांजरेकर ,बंटी केरकर ,मंगेश धुरी ,संदीप रुद्रे यांनी काम पाहिले तर समालोचनाची जबाबदारी काका सावंत, राजा सामंत ,बादल चौधरी, विजय बागायतकर, शेखर दळवी यांनी सांभाळली. गुणलेखन रुपेश कुडाळकर, सचिन कांबळी, सिद्धेश सावंत व समीर राणे यांनी केले.









