मालवण शिवसेनेच्या वतीने आयोजन
मालवण : प्रतिनिधी
लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालवण शिवसेनेच्या वतीने मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 61 रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जोपासली.
आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होत आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन त्या निमित्ताने करण्यात आले आहे. मालवण शिवसेनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक महिला रक्तदाते यावेळी उपस्थित होते मात्र हिमोग्लोबिन कमी व अन्य कारणांनी अनेक रक्तदाते यांना रक्तदान करता आले नाही.
नगराध्यक्ष ममता वराडकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती अन्वेशा आचरेकर, उपसभापती अश्विनी कांदळकर, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, नगरसेविका निना मुंबरकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, सिद्धार्थ जाधव, मेघा सावंत, शिवसेना पदाधिकारी राजा गावकर, बबन शिंदे, किसन मांजरेकर, शाम वाक्कर, प्रसाद आडवणकर, बाळू नाटेकर, राजू बिड्ये, भाई मांजरेकर, यशवंत गांवकर, सूर्यकांत फणसेकर, परशुराम पाटकर, अभय कदम, शेखर गाड, महेश सारंग, मोहन वराडकर, अभय कदम, निषय पालेकर, स्नेहल पराडकर, महिमा मयेकर, आनंद खवणेकर, नितेश पेडणेकर, विहार कोदे, तेजस लुडबे यासह अन्य पदाधिकारी, रक्तदाते, जिल्हा रुग्णालय ओरोस येथील वैद्यकीय टीम उपस्थित होती.
या शिबिरात युवक, महिली भगिनी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत रक्तदान केले. सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक रक्तदाते स्वेच्छेने पुढे येत रक्तदान केले. आयोजकांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.









