ठळक घडामोडी

डिगस सुर्वेवाडीत अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात; दादा साईल यांची फलंदाजी!

क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन; दादा साईल मैदानात उतरले

निखील कांदळगावकर यांची स्पर्धेला भेट; उद्यापर्यंत स्पर्धा रंगणार

कुडाळ : प्रतिनिधी
       जय भवानी युवा मंडळ, डिगस – सुर्वेवाडी यांच्या वतीने आयोजित अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेला आजपासून उत्साहात सुरुवात झाली. पणदूर–घोडगे मार्गावरील चोरगेवाडी फाटा (सुर्वेवाडी नजिक) येथील देवर्णा मैदानावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
     या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सरचिटणीस दादा साईल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. उद्घाटनप्रसंगी दादा साईल यांनी स्वतः बॅट हातात घेऊन मैदानात उतरून खेळाचा आनंद घेतला व फलंदाजी करत स्पर्धेचा शुभारंभ केला. यावेळी निखिल कांदळगावकर यांनीही स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
       याप्रसंगी नागेश परब, विनायक अणावकर, सुरेश तानिवडे, सुरेश सुर्वे, गजा सुर्वे, मोहन सुर्वे, अशोक सुर्वे, सुनील सुर्वे, भाई सुर्वे, सोन्या सावंत, तात्या पणदूरकर आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने युवक, ग्रामस्थ व क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. ही अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा रविवार, दि. २५ जानेवारीपर्यंत चालणार असून परिसरातील क्रिकेटप्रेमींमध्ये या स्पर्धेबाबत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

error: Content is protected !!