कुडाळ : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी आज शनिवारी मतदान होत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवण व कुडाळ तालुक्यातील विविध गावातील ठाकरे शिवसेना पक्षाच्या बुथवर भेट देऊन मतदानाचा आढावा घेतला. यावेळी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









