ठळक घडामोडी

माणगावमध्ये २४ मार्चला जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धा!

श्रीराम जन्मोत्सवानिमित्त स्पर्धेचे आयोजन; यशोदा सामाजिक विकास संस्थेचा पुढाकार

विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके व चषक; स्पर्धकांना सहभागाचे आवाहन

कुडाळ : प्रतिनिधी
     यशोदा सामाजिक विकास संस्था, माणगाव यांच्या वतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मंगळवार दिनांक २४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता माणगाव येथील मनोहर मंगल कार्यालय येथे होणार आहे.
   स्पर्धेसाठी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. प्रथम पारितोषिक म्हणून रोख रुपये ७०२६ व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रोख रुपये ५०२६ व चषक, तर तृतीय पारितोषिक रोख रुपये ३०२६ व चषक देण्यात येणार आहे. तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिकेही रोख रुपये १०२६ व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहेत.
या स्पर्धेसाठी परिसरातील कला प्रेमींनी तसेच नृत्य समूहांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन यशोदा सामाजिक विकास संस्था, माणगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!