ठळक घडामोडी

ओरोस गावडेवाडी येथील श्री भवानी देवीचा १६ जानेवारीला त्रैवार्षिक गोंधळ

विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

ओरोस : प्रतिनिधी
     श्री कुलस्वामिनी भवानी देवी उत्सव मंडळ, गावडेवाडी (ता. कुडाळ) यांच्या वतीने ओरोस गावडेवाडी येथील श्री भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ शुक्रवार, दि. १६ जानेवारी २०२६ रोजी भवानी मंदिर, गावडेवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.
         या धार्मिक कार्यक्रमासाठी परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या दिवशी सकाळी ८ वा. देवीची पूजा, ९ वा. संबळ पूजा, दुपारी १२ वा. नवस फेडणे/बोलणे, सायंकाळी ५वा. जोगवा मागणे, सायंकाळी ७ वा. महाप्रसाद, रात्रौ. ९:३० वा. मांड भरणे, ओटी भरणे, रात्रौ ११ वा. गोंधळ आणि पहाटे दिवटी विसर्जन करून गोंधळ कार्यक्रमाची सांगता होणार आहे. त्रैवार्षिक कार्यक्रमानिमित्त असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. देवीच्या नामस्मरणात व गोंधळाच्या तालावर संपूर्ण परिसर भक्तिमय होणार आहे. या पावन त्रैवार्षिक गोंधळ सोहळ्यास भाविकांनी कुटुंबीय व मित्रपरिवारासह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री कुलस्वामिनी भवानी देवी उत्सव मंडळ, गावडेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!