ठळक घडामोडी

कुडाळ शिवसेना पंचायत समिती पक्षाचा गट स्थापन

गटनेतेपदी निखिल कांदळगावकर यांची एकमताने निवड

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ पंचायत समितीमध्ये शिवसेना पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्यांनी शिवसेना पंचायत समिती पक्ष या नावाचा गट स्थापन करण्यात आला आहे. या गटाचे गटनेते डिगस ५५ चे सदस्य निखील नित्यानंद कांदळगावकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
    कुडाळ- मालवण मतदारसंघाचे शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या आदेशाने व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या सूचनेनुसार कुडाळ पंचायत समितीमध्ये शिवसेना तिकिटावर निवडून आलेले निखील कांदळगावकर, मिलिंद नाईक, बाळकृष्ण मडव, प्रियांका दळवी, अश्विनी सावंत, दिव्यांनी खरात यांनी एकत्र येत शिवसेना पंचायत समिती पक्ष या नावाचा अधिकृत गट स्थापन केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना लेखी पत्र देण्यात आले असून गट स्थापन करणे बाबत ठराव व त्याबद्दलचे इतिवृत्त सादर करण्यात आले. कुडाळ शिवसेना पंचायत समिती पक्ष गटनेते पदी निखिल नित्यानंद कांदळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या पत्राच्या अनुषंगाने गट स्थापन केल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे

error: Content is protected !!