ठळक घडामोडी

डिगस पं.स. मतदारसंघात निखील कांदळगावकरांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू!

महायुतीचे पदाधिकारी-कार्यकर्ते मैदानात; प्रचाराला वेग

गावोगावी गाठीभेटी, मतदारांशी थेट संवादावर भर

कुडाळ : प्रतिनिधी
       कुडाळ तालुक्यातील डिगस पंचायत समिती मतदारसंघात शिंदे शिवसेना – महायुतीचे उमेदवार निखील नित्यानंद कांदळगावकर यांनी झंझावाती प्रचार दौऱ्याला सुरुवात केली आहे. मतदारसंघातील गावागावात जाऊन ग्रामस्थ व मतदारांच्या गाठीभेटी घेत थेट संवाद साधत आहेत.
     त्यांच्या प्रचारासाठी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने मैदानात उतरले असून, कांदळगावकर यांच्या प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. घरोघरी भेटीगाठींवर विशेष भर देत त्यांनी मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
      डिगस, पणदूर, हुमरमळा व अणाव या गावांमध्ये प्रचार दौरा करण्यात आला. यावेळी शिंदे शिवसेनेचे विधानसभा मतदारसंघ प्रचार प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, पावशी जिल्हा परिषद उमेदवार दादा साईल, डिगसचे माजी उपसरपंच अमर घाडी, उदय घोगळे, विनायक अणावकर यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!