ठळक घडामोडी

महाराष्ट्राने एक कर्तव्यदक्ष, स्पष्टवक्ते आणि निर्णयक्षम नेतृत्व गमावले – अमित सामंत

कुडाळ : प्रतिनिधी
      महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, लहान-थोर सर्वांचे दादा म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांचे निधन ही महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद व हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे. त्यांच्या जाण्याने राज्याने एक कर्तव्यदक्ष, स्पष्टवक्ते आणि निर्णयक्षम नेतृत्व गमावले आहे.
      सन १९८२ पासून राजकारणात पदार्पण केल्यानंतर त्यांनी कधीही विश्रांती घेतली नाही. निर्भीड भूमिका, प्रशासकीय यंत्रणेवर असलेला वचक आणि लोकहितासाठी कठोर निर्णय घेण्याचे धाडस ही त्यांच्या नेतृत्वाची ओळख होती. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत जनतेच्या प्रश्नांसाठी घेतलेले ठाम निर्णय, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि प्रशासनातील योगदान हे कायम स्मरणात राहील. त्यांच्या जाण्याने सार्वजनिक व राजकीय जीवनात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना व समर्थकांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तसेच अजित दादा पवार यांना सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

अमित सामंत
अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पार्टी

error: Content is protected !!