शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून पायवाट
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील चेंदवण–ठुंबरेवाडी येथील ग्रामस्थांच्या दळणवळणासाठी अत्यंत आवश्यक असलेली पायवाट आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून उपलब्ध करून दिल्याबद्दल चेंदवण ठुंबरेवाडीतील ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.
या पायवाटेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजय पडते, चेंदवणचे माजी सरपंच व शिवसेना कुडाळ उपतालुका प्रमुख देवेंद्र नाईक, माजी उपसरपंच सौ. रश्मी नाईक, शिवसेना विभागीय समन्वयक कल्पेश पोयरेकर, नाईकनगर शाखा प्रमुख राजेश पोयरेकर, युवासेना शाखा प्रमुख अभिलाष परब, उपशाखा प्रमुख रोशन कासवकर तसेच ठुंबरेवाडीतील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी या पायवाटेमुळे दैनंदिन ये-जा सुलभ होणार असून विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा लाभ होणार असल्याची भावना व्यक्त केली.









