ठळक घडामोडी

कुडाळ तालुक्यातील दोन जीर्ण पुलांच्या पुनर्बांधणीसाठी १.३७ कोटींची मंजुरी

आमदार निलेश राणेंच्या पाठपुराव्याला यश


फोटो आ.निलेश राणे
कुडाळ : प्रतिनिधी
     आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्याच्या हिवाळी अधिवेशनात सादर झालेल्या पुरवणी बजेट अंतर्गत कुडाळ तालुक्यातील दोन जीर्ण पुलांच्या पुनर्बांधणीसाठी एकूण १ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे धोकादायक अवस्थेत असलेल्या पुलांच्या प्रश्नाला दिलासा मिळाला आहे. दरम्यान या पुलांची लवकरच पुर्णबांधणी करण्यात येणार असल्याची माहीती आ.राणे यांनी दिली.
    या मंजूर निधीत राज्य मार्ग १९० वरील निळेली येथील पुलाच्या पुनर्बांधणीसाठी ७० लाख रुपये, तर प्रमुख जिल्हा मार्ग ५१ (एमडीआर) वरील आकेरी–आंबेरी वाडोस रस्त्यावरील पुलाच्या पुनर्बांधणीसाठी ६५ लाख रुपयांचा समावेश आहे. सदर दोन्ही पुलांची पुनर्बांधणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
   कुडाळ व मालवण तालुक्यातील अनेक पुलांची अवस्था जीर्ण झाली असून वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन या पुलांच्या पुनर्बांधणीबाबत सविस्तर निवेदन सादर केले होते. त्याचाच परिणाम म्हणून पहिल्या टप्प्यात दोन पुलांच्या कामांना शासनाने मंजुरी दिली आहे.
    या पुलांच्या पुनर्बांधणीमुळे स्थानिक नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच वाहनचालकांना सुरक्षित व सुकर वाहतुकीचा लाभ मिळणार असून परिसरातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. उर्वरित धोकादायक पुलांसाठीही लवकरच पुढील टप्प्यात निधी मंजूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!