ठळक घडामोडी

कणकवली – बिडवाडीत भाजपच्या संजना राणे बिनविरोध!

कणकवली पंचायत समितीत भाजपचा श्री गणेशा

भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

कणकवली: प्रतिनिधी
    कणकवली तालुक्यातील पंचायत समिती मधील बिडवाडी मतदारसंघातून ठाकरे सेनेच्या विद्या शिंदे यांचा अर्ज बाद ठरला आहे. त्‍यामुळे भाजपच्या संजना राणे या बिनविरोध ठरल्‍या आहेत. त्‍यामुळे कणकवली पंचायत समितीमध्ये भाजपने आपले खाते खोलले आहे. या बिनविरोध निवडीनंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत मोठा जल्लोष केला.
     या विभागाचे प्रमुख प्रमुख भाजपा पदाधिकारी संदीप सावंत, तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवक चे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, शिवसेना तालुका अध्यक्ष दामू सावंत,हेमंत परुळेकर,परशुराम झगडे,रंजन राणे, राजू हिर्लेकर, डॉक्टर सत्यवान राणे, संदेश सावंत सुधीर सावंत, प्रज्वल वरदम, सुदाम तेली दादा भोगले बंडू साटम बाबाजी चव्हाण आनंद साटम भाई आंबेडकर अशा विभागातील अनेक पदाधिकाऱ्यांनी कागदपत्रे माहिती गोळा केली.
    जिल्‍हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांच्या अर्जांची छाननी येथील तहसील कार्यालयात सुरू आहे. यात जानवली जिल्‍हा परिषद आणि पंचायत समिती अंतर्गत जानवली आणि बिडवाडी मतदारसंघातील उमेदवारांची छाननी प्रक्रिया दुपारी साडे अकरा वाजता सुरू झाली. यात ठाकरे सेनेच्या विद्या शिंदे यांच्या उमेदवारीला भाजपच्या उमेदवार संजना राणे यांनी हरकत घेतली. त्‍यांच्यावतीने ॲड.उमेश सावंत यांनी बाजू मांडली.

error: Content is protected !!