
घर टू घर प्रचारावर भर; प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
परिवर्तनाची नांदी – योगेश तावडेंचा विश्वास

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील ओरोस पंचायत समिती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार योगेश राजाराम तावडे यांनी निवडणूक रिंगणात उतरून प्रचाराला वेग दिला आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणारा, हक्काचा आणि विश्वासू उमेदवार मतदारसंघाला मिळावा, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
योगेश तावडे यांनी प्रचारादरम्यान गावागावात भेटी देत थेट नागरिकांशी संवाद साधला. पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, शेतकरी व युवकांचे प्रश्न याबाबत त्यांनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. पक्षीय राजकारणापेक्षा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास महत्त्वाचा असून, निवडून आल्यास प्रामाणिकपणे लोकांची कामे करण्याचे प्राधान्य राहील, असे त्यांनी सांगितले.
ओरोस मतदारसंघातील नागरिकांना केवळ आश्वासने देणारा नव्हे तर प्रत्यक्ष काम करणारा, सहज उपलब्ध होणारा आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा राहणारा प्रतिनिधी हवा आहे, अशी भूमिका अनेक ग्रामस्थ मतदार व्यक्त करत आहेत. त्यामुळे अपक्ष उमेदवार योगेश तावडे यांना दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळताना दिसत आहे. युवावर्ग, मित्रपरिवार त्यांच्या प्रचारात सहभागी झाले असून, घर टू घर प्रचारावर भर देण्यात येत आहे. प्रचाराला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, हिच परिवर्तनाची नांदी आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास योगेश तावडे यांनी व्यक्त केला.








