ठळक घडामोडी

पिंगुळी जि.प. मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा प्रचार वेगात!

गंगाराम सडवेलकर, ममता राऊळ व कृष्णा धुरी यांचा मतदारांशी थेट संवाद

पदाधिकारी – कार्यकर्ते उतरले प्रचारात ; प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ तालुक्यातील पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने निवडणूक प्रचाराला चांगलाच वेग दिला आहे. जिल्हा परिषद उमेदवार गंगाराम सडवेलकर, पिंगुळी पंचायत समिती उमेदवार ममता राऊळ तसेच साळगाव पंचायत समिती उमेदवार कृष्णा धुरी यांच्या प्रचारासाठी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.
    या प्रचारादरम्यान गंगाराम सडवेलकर, कृष्णा धुरी आणि ममता राऊळ हे तिन्ही उमेदवार स्वतः मतदारसंघात फिरून नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत आहेत. स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि भविष्यातील धोरणांबाबत मतदारांशी सविस्तर चर्चा करण्यात येत आहे. प्रचारात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले असून, मतदारांकडून प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे उमेदवारांनी सांगितले.

error: Content is protected !!