ठळक घडामोडी

वेंगुर्ले श्री मानसीश्वर देवस्थानच्या जत्रोत्सवाला भाविकांची अलोट गर्दी!

वेंगुर्ला : प्रतिनिधी
     वेंगुर्ला तालुक्यातील प्रसिद्ध श्री देव मानसीश्वर यांच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी सोमवारी भाविकांची अलोट गर्दी झाली. मोठ्या दिमाखात हा जत्रोत्सव साजरा करण्यात आला.
      सोमवारी पहाटे सुमारे ३.३० वाजता या जत्रोत्सवाला विधिवत प्रारंभ झाला. भगवी निशाणे देवतेस अर्पण करण्यासाठी वेंगुर्ला शहरासह तालुक्यातील सर्व ग्रामीण भाग, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, महाराष्ट्रासह गोवा व इतर राज्यांतून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. वेंगुर्ला एस.टी. स्थानकापासून मानसीश्वर मंदिर परिसरापर्यंत पहाटेपासून नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रात्री गॅसबत्तीच्या प्रकाशात पार्सेकर दशावतार कंपनीचे दशावतारी नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व ग्रामस्थ व प्रशासनाच्या वतीने सुयोग्य नियोजन करण्यात आले होते. रात्री जत्रोत्सवानिमित्त भाविकांचा जनसागर लोटला. परिसरात मोठ्या संख्येने विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली होती. मोठ्या उत्साहात हा जत्रोत्सव साजरा करण्यात आला.

error: Content is protected !!