कुडाळ : प्रतिनिधी
महाराष्ट्र एसटी कामगार सेना कुडाळ आगाराच्या अध्यक्षपदी दीपक भोगले तर सचिवपदी महेश वेंगुर्लेकर यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र एसटी कामगार सेना २०२६-२७ साठी कुडाळ आगाराची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उपाध्यक्ष आशिष डिचोलकर, सहसचिव हृषीकेश कोरगावकर, खजिनदार निलेश शिरोडकर,
सहखजिनदार मुकुंद बोगार, प्रसिद्धीप्रमुख देवेंद्र पाटणे, कार्याध्यक्ष विलास सावंत, महिला अध्यक्षा अर्चना सावंत, विभागीय सदस्य अमोल परब व तुकाराम शेळके, शंकर बांदेकर, रविंद्र बिले, विनायक गावडे, महेंद्र पवार, संदीप रासम, संतोष धुरी यांची निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे तालुकाप्रमुख मिलिंद दळवी, जिल्हाध्यक्ष अनुप नाईक, विभागीय सचिव भगवान धुरी,कुडाळ आगार माजी सचिव अमोल परब उपस्थित होते.









