
कुडाळ : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मंगळवार दि.३ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून, सायं. ४ वाजता त्यांची जाहिर प्रचार सभा कुडाळ येथील कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे. या पार्श्वभूमीवर काल सायंकाळी आमदार निलेश राणे यांनी सभेच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन नियोजन व तयारीचा आढावा घेतला.









