ठळक घडामोडी

पालकमंत्री नितेश राणे सोमवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर!

विविध बैठकांना उपस्थिती; नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांची सदिच्छा भेट

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
     राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे हे सोमवार दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
    सोमवारी सकाळी 9 वा. ओम गणेश निवासस्थान कणकवली येथून मोटारीने वैभववाडी कडे प्रयाण, सकाळी 9.30 वा. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित वैभववाडी तालुक्यातील ‘ बाल कला,  क्रीडा व ज्ञानी मी होणार’ महोत्सवात उपस्थिती, सकाळी 11 वा.मोटारीने ओरोस कडे प्रयाण, दुपारी 12.30 वा. जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग मधील विकास कामांसंदर्भात आढावा बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग), दुपारी 1.30 वा.  शिरोडा – वेळागर येथील हॉटेल ताजच्या जमिनी संदर्भात बैठक (स्थळ – जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग), दुपारी 2 वा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू प्रश्नांबाबत बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग), दुपारी 2.30 वा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिरे – खाण व्यवसायिकांच्या समवेत बैठक (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग ), सायं 5 वा. देवगड व वैभववाडी तालुका भाजप पदाधिकाऱ्यांची भेट तसेच देवगड पाणीपुरवठा योजनेसाठी नियुक्त स्थायी समिती समवेत बैठक (स्थळ – शासकीय विश्रामगृह कणकवली), सायंकाळी 7 वा. मोटारीने वेंगुर्ला कडे प्रयाण, सायं. 7.30 वा.  वेंगुर्ला नगर परिषदेत निवडून आलेले नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांची सदिच्छा भेट (स्थळ – भाजपा कार्यालय वेंगुर्ले), रात्री 8 वा. मोटारीने सावंतवाडी कडे प्रयाण, रात्री 8.30 वा. सावंतवाडी नगर परिषदेत निवडून आलेले नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांची सदिच्छा भेट (स्थळ – भाजप कार्यालय सावंतवाडी) व रात्री 9 वाजता मोटारीने मोपा, गोव्याकडे प्रयाण.

error: Content is protected !!