नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या पुढाकारातून उपक्रम
१४ अंगणवाड्यांना वाॅटर प्युरिफायर; विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या माध्यमातून आज शहरातील सर्व १४ अंगणवाड्यांना वाॅटर प्युरिफायर भेट देण्यात आले. तसेच लहान मुलांना खाऊ व शैक्षणिक साहित्याचेही वाटप करण्यात आले.
नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या संकल्पनेतून हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. अंगणवाड्यांमधील मुलांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी एक्वागार्डचे वाॅटर प्युरिफायर सर्व अंगणवाड्यांना देण्यात आले. याशिवाय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.
या प्रसंगी नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे, नगरसेवक विलास कुडाळकर, ॲड. राजीव कुडाळकर, गणेश भोगटे, नगरसेविका अक्षता खटावकर, आफरीन करोल, श्रेया गवंडे, ज्योती जळवी, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, शिवसेना उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक, युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर, उपशहर प्रमुख चेतन पडते, राजू गवंडे, प्रथमेश केळबाईकर, साक्षी सावंत, रेवती राणे, रेखा काणेकर, बाळा कुडाळकर, अजित गावडे, वरू राणे, लवू कदम आदींसह महायुतीचे कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका, मदतनीस व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









