ठळक घडामोडी

मालवणमध्ये रंगली पाककला व ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धा!

पाककला स्पर्धेत भाग्यश्री महिला बचत गट प्रथम

‘खेळ पैठणीचा’ स्पर्धेत भक्ती आचरेकर पैठणीच्या मानकरी

मालवण : विजेत्या स्पर्धकांसमवेत नगराध्यक्षा ममता वराडकर. सोबत अन्वेषा आचरेकर, अश्विनी कांदळकर, अर्चना मिठबांवकर, पूनम चव्हाण, दर्शना कासवकर व अन्य. (छाया : श्रीराज बांदेकर, मालवण)

मालवण : महेश कदम
     जागतिक महिला दिनानिमित्त मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने मामा वरेरकर नाट्यगृहात महिलांसाठी घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेत मालवणच्या भाग्यश्री महिला बचत गटाने प्रथम क्रमांक मिळविला तर खेळ पैठणीचा स्पर्धेत भक्ती शिवराम आचरेकर पैठणीच्या मानकरी ठरल्या.
    मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने पाककला स्पर्धा आणि खेळ पैठणीचा हा कार्यक्रम पार पडला.
    या स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमास ५०० हुन अधिक महिला उपस्थित होत्या. पाककला स्पर्धेत २५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यामध्ये द्वितीय क्रमांक समृद्धी महिला बचतगट व तृतीय क्रमांक रामेश्वर महिला बचत गटाने मिळविला.  तर खेळ पैठणीचा स्पर्धेत३५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यामध्ये द्वितीय क्रमांक हेमांगी आचरेकर व तृतीय क्रमांक सरस्वती परब यांनी मिळविला.
     पाककला स्पर्धेसाठी विनय गावकर व संजय गावडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेसाठी नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागप्रमुख रसिका कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन अक्षय सातार्डेकर यांनी केले.
     विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले तर सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी ६५ वर्षावरील होतकरू ज्येष्ठ महिलांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष ममता वराडकर, महिला व बालकल्याण सभापती सौ. अन्वेषा आचरेकर, उपसभापती सौ. अश्विनी कांदळकर, माजी नगराध्यक्ष अर्चना मीठबावकर, माजी उपनगराध्यक्ष स्वप्नाली नेरुरकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, नगरसेविका दर्शना कासवकर, मेघा गावकर, अनिता गिरकर, नीना मुंबरकर, महानंदा खानोलकर, भाग्यश्री मयेकर, महिला व बालकल्याण विभागप्रमुख रसिका कुलकर्णी आदी व इतर उपस्थित होते.

error: Content is protected !!