ठळक घडामोडी

कवठी येथे 10 जानेवारीला आमने-सामने डबलबारी भजनाचा सामना!

बुवा संदीप पुजारे विरुद्ध बुवा श्रीकांत शिरसाट यांच्यात रंगणार सामना

रणझुंजार मित्र मंडळ, संजय करलकर मित्रमंडळ, कवठी ग्रामस्थ व उद्योजक रुपेश पावसकर यांचे आयोजन

कुडाळ : प्रतिनिधी
      रणझुंजार मित्र मंडळ व संजय करलकर मित्रमंडळ (कवठी), कवठी ग्रामस्थ तसेच उद्योजक रुपेश पावसकर यांच्या पुरस्कृत आमने-सामने डबलबारी भजनांचा सामना शनिवार, दि. 10 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता कवठी येथील श्री सातेरी मंदिर पटांगण येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहीती रूपेश पावसकर यांनी दिली.
     हा भजनबारीचा सामना श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ (नाडण, ता. देवगड)चे बुवा संदीप पुजारे (पखवाज साथ संकेत राऊत व तबला साथ कौस्तुभ घाडी) विरूद्ध ओम चैतन्य गगनगिरी प्रासादिक भजन मंडळ (उंबर्डे, ता. वैभववाडी)चे बुवा श्रीकांत शिरसाट (पखवाज साथ अमोल पांचाळ व तबला साथ विनायक रांबाडे) यांच्यात होणार आहे. तरी भजन रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून या भजन सामन्याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन रणझुंजार मित्र मंडळ, संजय करलकर मित्रमंडळ (कवठी), कवठी ग्रामस्थ व उद्योजक रुपेश पावसकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!