ठळक घडामोडी

नेरूरच्या श्री देव कलेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी!

अणाव येथील श्री स्वयंभू रामेश्वर मंदिरातही दर्शनासाठी रांगा

महाशिवरात्रीचा उत्साह; रात्री दिमाखदार रथोत्सव सोहळा

नेरूर : श्री क्षेत्र कलेश्वर मंदिरात रविवारी महाशिवरात्री उत्सवानिमित्त श्री कलेश्वर महाराजांची श्री पंचमुखी उत्सवमूर्तीची महापूजा बांधण्यात आली.

कुडाळ : प्रतिनिधी
      कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील श्री देव कलेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रोत्सवानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. नेरूरसह अणाव मधील श्री स्वयंभू रामेश्वर मंदिरातही महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी होत असून, श्रींच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. नेरूर आणि अणाव येथे गेले पाच दिवस महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. आज महाशिवरात्रीनिमित्त मंदिर परिसर भाविकांच्या अलोट गर्दीने गजबजून गेला आहे. मंदीर व परिसरातील आकर्षक विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मंदिर परिसरात थाटण्यात आली आहेत. रात्री मोठ्या दिमाखात रथोत्सव साजरा होणार आहे. बांबुळी श्री देव ब्रम्हेश्वर मंदीर, पांग्रड श्री देव स्वयंभू, पावशी श्री देव लिंगेश्वर, डिगस चोरगेवाडीसह तालुक्यात ठिकठिकाणी आज महाशिवरात्री उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे.

error: Content is protected !!