ठळक घडामोडी

कुडाळमध्ये मुख्य रस्त्यावर एसटी बस बंद; वाहतूक खोळंबली!

गीता हॉटेलसमोर बस बिघाडामुळे वाहनांच्या रांगा

वाहतूक पोलिसांची धाव; एसटी प्रशासनाकडून दुरुस्ती सुरू

कुडाळ : प्रतिनिधी
    कुडाळ शहरातील मुख्य रस्त्यावर गीता हाॅटेल समोर वेंगुर्ले एसटी आगाराची एसटी बस अचानक बंद पडल्याने, या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली आहे. हि घटना आज दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास घडली. दोन्ही बाजूनां लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कुडाळ पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस अमोल बंडगर यांनी घटनास्थळी धाव घेत, वाहतूक पुर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. एसटीच्या मेकॅनिकनी घटनास्थळी धाव घेत, दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. मात्र या मुख्य रस्त्यावरील वाहतूक गेल्या तासाभरापासून खोळंबली आहे.

error: Content is protected !!