कुडाळ : प्रतिनिधी
कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, कुडाळच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय शालेय आट्यापाट्या स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. १४ वर्षांखालील मुले व मुली तसेच १९ वर्षांखालील मुलींच्या संघांची विभागस्तरीय शालेय आट्यापाट्या स्पर्धेसाठी निवड झाली असून या संघांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचा मान मिळविला आहे. दि. २३ व २४ डिसेंबर २०२५ रोजी वामनराव महाडिक विद्यालय, तळेरे या ठिकाणी हि विभाग स्तरीय स्पर्धा होणार आहे.
जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजच्या संघांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत सर्व प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. या १४ वर्षाखालील मुलांच्या विजेत्या संघात अक्षय हनबर, वरद जोशी, स्वरूप मोडक, वेदांत भोसले, रिषित कोळकर, मोहम्मद अन्सारी, मयंक सुळेभावी, पियुष भगत, पार्थ भगत, निहाल उमळकर, तन्मय आचरेकर, जयेश कुंभार या खेळाडूंचा समावेश होता. तसेच १४ वर्षाखालील मुलींच्या विजेत्या संघात जुई चव्हाण, सुष्टी शेटकर, वैदवी कर्पे, स्वरा जाधव शालिनी दळवी, वैभवी राणे, लावण्या गावडे, रोशनी कदम, दुर्वा देसाई, तनया घोगळे, जैलेशा तेजम, चीत्रली कुंभार या खेळाडूंचा समावेश होता. तसेच १९ वर्षाखालील मुलींच्या विजेत्या संघाची ज्योती चव्हाण, मैमोनिसा शहा, कार्तिक परब, मनस्वी पाटील, प्रीती बावकर, पूर्वा सावंत, नम्रता गोसावी, दुर्वा पाटील, दिव्या आगलावे, दिया परब, तन्वी बांबुळकर, हर्षदा तेली या खेळाडूंचा समावेश होता.
या खेळाडूंना प्रशालेतील जेष्ठ क्रीडा शिक्षक विजय मयेकर व रामचंद्र खाकर यांनी मार्गदर्शन केले. संस्थेच्यावतीने पदाधिकारी उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, का. आ. सामंत, आनंद वैद्य, सुरेश चव्हाण, महेंद्र गवस तसेच कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कुडाळचे मुख्याध्यापक विपिन वराडे, उपमुख्याध्यापक प्रवीण भोगटे, पर्यवेक्षक रंजन तेली, क्रीडा विभाग प्रमुख विजय मयेकर, क्रीडा शिक्षक अनिल पोवार, वैभव कोंडसकर, सिद्धार्थ बावकर व शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग यांनी सर्वांचे अभिनंदन केले तसेच दिनांक २३ डिसेंबर व २४ डिसेंबर २०२५ रोजी वामनराव महाडिक विद्यालय तळेरे या ठिकाणी होणाऱ्या विभाग स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.









